____उपक्रम वृत्त__
सिंहगड भाग -पुणे महानगर / तिथी : आषाढ शु. ११
दि६ जुलै २०२५, रविवार
पॉलिथिन मुक्त मंदिर परिसर अभियान - पर्यावरण पूरक आषाढी एकादशी
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी, सिंहगड रोड पुणे
(|आयाम धार्मिक | विठ्ठलवाडी नगर | विश्रांती नगर वस्ती)
स्थान माहिती (Why Vithhalwadi Temple)
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी, सिंहगड रोड पुणे येथे प्राचीन श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे, ते प्रती पंढरपूर या नावाने पण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी भाविक मोठया संख्येने दर्शनाला येतात आणि एक प्रकारची यात्राच असते.
समस्या विधान - Problem Statement
मंदिर परिसरात येताना फुले - तुळशी-प्रसाद साठी पॉलिथिन पिशवी, प्रसाद वाटपासाठी पॉलिथिन/थर्मोकोल द्रोण असा मोठया प्रमाणात कचरा जमा होऊन धार्मिक परिसर अस्वच्छ होत असे.
समस्यावर पर्याय / उपक्रम हेतू (Key Objective)
आपले मंदिर आणि उत्सव पर्यावरण पूरक करावेत यासाठी पॉलिथिन बॅगला कागदी पिशवी पर्याय म्हणून पुढे आला आणि सलग तीन वर्षे आषाढी एकादशीला हा उपक्रम चालू आहे.
मुळात मानसिकता परिवर्तन आणि प्रबोधन हाच हेतू या उपक्रमाचा आहे. सोबत कापडी पिशवी ठेवावी, Single Use प्लास्टिक वापर टाळाव, असे जन जागरण झाले पाहिजे हाच हेतू आहे.
पूर्वतयारी व नियोजन (Detail Planning)
सिंहगड भागाचा हा एक दीर्घकालीन दृष्टी (Long Term Vision) असलेला उपक्रम आहे, त्यासाठी मंदिर विश्वस्थ, पुणे महानगर पालिका, पोलीस यंत्रणा आणि गतीविधी कार्यकर्ते असे सगळयांना एकत्र घेऊन करण्याचा प्रयत्न आहे/होता.
विश्वस्थ भेटी आणि परवानगी, मनपा - आरोग्य अधिकारी भेटी आणि उपक्रम माहिती अश्याप्रकारे सुरुवात प्राथमिक सुरवात झाली.
कागदी पिशवी निर्मिती आणि संकलन (Preparation)
दरवर्षी पिशवी तयार प्रकियेत बदल करून आकर्षक आणि User Friendly करण्यात भर होता. तसा व्हिडीओ तयार करून आवाहन निरोप वेगवेगळया ग्रुपवर पाठविला जातो, त्याला उदंड आणि उत्साही प्रतिसाद पुणेकर नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिला.
गेली २ वर्षी चे कार्य पाहता, मंदिर परिसरात उपक्रम माहितीसाठी पुणे मनपा च्या सहकार्याने कागदी पिशवी आवाहन साठी मोठे फलक लावण्यात आले होते.
सहभागी - संस्था, शाळा, विदयार्थी झ कार्यकर्ते (People, Institutes, Student Contribution)
सिंहगड भागातील ४ शाळा, अन्य भागातील २ शाळा, जवळपास १०+ सोसायटी, ३ सामाजिक संस्था, स्वयंसेवक/त्यांचे कुटुंबीयांनी जवळपास ११०००+ कागदी पिशव्या तयार नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावला.
भागाची गतीविधी टीमचे २० कार्यकर्ते, नगरातील १० स्वयंसेवक, वस्ती रचना, व्यवसायिक ४ शाखा, समिती सेविका यात सहभागी झाल्या होत्या.
एकादशी कार्यक्रम
-- सकाळी ७ ते रात्री ८--
सकाळी या उपक्रमाचे अनौपंचारिक उदघाटन पोलीस निरीक्षक श्री. शिंदे साहेब, मा. नगर संघचालक श्री संजयजी बापट आणि भाग गतीविधी सहकार्य श्री दत्ताजी काळे यांच्या हस्ते करून फुले विक्रेत्यांना मोफत कागदी पिशव्या वाटपाला सुरवात केली.
सतत दिवसभर गतीविधी कार्यकर्ते/स्वयंसेवक/बाल स्वयंसेवक - नारीशक्ती सहित पूर्ण परिसरात सर्व फुले विक्रेत्यांना कागदी पिशवी वाटप, दर्शन रांगेत भाविकांकडून पॉलिथीन बॅग घेणे व त्यांना पर्यायी पिशवी दिली, या उपक्रमाची माहिती ध्वनींक्षेपका वर सतत सांगणे, असा क्रम चालू होता.
पुणे मनपा - आरोग्य टीमला आणि पुणे पोलिस यंत्रणेला याचे विशेष कौतुक होते, त्याची विशेष मदत या कामात झाली, सहकार्य होते. नागरिकांनी विरोध नाही तर सकारात्मक प्रतिसाद दिला आणि समाधान व्यक्त केलं,
तर स्वछता कर्मचारी आनंदी होते. सतत 3 वर्षे असे काम भागात पर्यावरण संरक्षण क्षेत्रात बदल होत असल्याचा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे.
चरणसेवा उपक्रम सोबत पर्यावरण संरक्षण गतीविधी माहितीचा स्टॉल पण होता. अनेक मान्यवरांनी याला भेट दिली आणि उपक्रमाची माहिती घेतली.
उपक्रम हेतू साध्यता (Program Output)
हे कार्य यशस्वीपणे होण्यासाठी देवस्थान विश्वस्थ - गोसावी परिवार, पुणे मनपा - आरोग्य विभाग, आणी पर्यावरण संरक्षण गतिविधी सिंहगड रोड यांचे एकत्रितपणे नियोजन आणि सहभाग होता.
आपले मंदिर स्वच्छ आणि पॉलिथिन मुक्त होण्यासाठी केलेला हा दृढ संकल्प सिद्धीला नेताना मानसिक परिवर्तन करण्यात आपण यशस्वी होत आहोत, असा विश्वास सदैव मनात ठेवून हा उपक्रम नवीन संकल्पनेसह करीत राहू.
सर्वांच्या प्रेमळ सहकार्यानेच आणि अविरत प्रयत्नाने हा उपक्रम यशस्वी होत आहे.
सिंहगड भाग - पर्यावरण संरक्षण गतीविधी भाग मंडळ